
Sameer Wankhede : नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी मुंबई प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांनी टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्यांवर मोकळेपणे चर्चा केली आहे. मुंबईत नियुक्तीला असताना त्यांच्यावर बॉलीवूडला टार्गेट केल्याचा आरोप झाला होता. त्यावर त्यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत.मी जीवनात साडे तीन हजाराहून अधिक केस दाखल केलेल्या आहेत, त्या सर्व बॉलीवूड विरोधात होत्या का ? असा सवाल त्यांनी केला आहे.
समीर वानखेडे यांना प्रश्न विचारला गेला की ज्या दिवसापासून ते मुंबईत आले, त्या दिवसापासूनच बॉलीवूडच्या विरोधात कारवाई सुरु केली असा आरोप फिल्म इंडस्ट्रीचे लोक करत असतात. यावर तुमचे काय उत्तर आहे यावर माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितले की म्हणजे तुम्ही आणि हे लोक ( बॉलीवूड वाले ) काय अपेक्षा करता ? सोडून द्यायचे या लोकांना. जर कोणत्याही प्रकारे कायद्याचे पालन होत नसेल. काही चुकीचे घडत असेल तर माझ्याकडून ही अपेक्षा करणार की मी यांना सोडावे. किंवा कोणी अन्य अधिकारी जो आपले काम करत आहे त्याने यांना सोडून द्यावे ? असे होऊ शकत नाही.
घटनेसमोर सर्व समान
समीर वानखेडे यांनी सांगितले की संविधान आणि कायदा कोणाला खास विशेषअधिकार देत नाही. जर काही सापडले तर त्यांना कायद्याचा सामना करावा लागणार. मी माझ्या करियरमध्ये ज्या केस दाखल केल्या आहेत. त्यात हार्ड कोअर पेडलर, हार्ड कोअर स्मगलराच्या विरोधात केल्या आहेत. जेवढे मला आठवते,मी जवळपास ३५०० केस दाखल केल्या आहेत. तर त्या या तथाकथित इंडस्ट्रीज संदर्भात आहे का ? असे काही घडलेले नाही.
समीर वानखेडे यांनी सांगितले की ही बातमी मीडियात चालली कारण या तथाकथित सेलिब्रिटीजना फेस व्हॅल्यू आहे. कारवाई केली गेली याचा हा अर्थ नाही की आम्ही कोणाला टार्गेट करत आहे. किंवा मी कोणाला टार्गेट करत आहे ?
‘जवान’च्या डायलॉगवर काय म्हणाले वानखेडे ?
जवान चित्रपटात शाहरुखच्या तोंडी एक डायलॉग होता की, ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर’ हा डायलॉग समीर वानखेडे यांच्याशी जोडला गेला. सोशल मीडियावर दावा केला गेला ही हा डायलॉग समीर वानखेडे यांच्याविरोधात होता. त्यावर वानखेडे म्हणाले की पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीने मी त्रस्त होत नाही. मला माहिती नाही तुम्ही कशाबद्दल विचारत आहात. मी चित्रपट आणि अशा गोष्टीत इंटरेस्ट घेत नाही.
पुढे ते म्हणाले की दुसरी गोष्ट, ‘त्यांनी जो डायलॉग बोलला जेव्हा कोणी मला विचारले. माझे तर एवढेच मत आहे ही भाषा भारतीय संस्कृतीच्या हिशेबाने योग्य नाही. ही तर रोड साईड टाईप गोष्ट वाटते. जसे झोपड्यातील लोक बोलत असतात. आपली संस्कृती खूप महान आहे. आपण आपल्या वडीलांचे नाव देखील आदराने घेतो. त्यांना पिताजी असे म्हणतो. हे ऐकायला एकदमच सडकछाप वाटते. त्यामुळे आम्ही अशा सडकछाप गोष्टीने परेशान होत नाही.’