चमोली, : उत्तराखंडच्या जिल्ह्यातील रविवारी घडलेल्या दुर्घटनेनंतर अजूनही बचावकार्य सुरू आहे. अत्यंत प्रयत्नांनी तपोवन आतपर्यंत पोहचण्याचा आणि इथे अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. एलटीपीसी ऊर्जा प्रकल्पाच्या या बोगद्यात जवळपास ४० लोक अडकले गेले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. (अपडेट बातमी मिळवण्यासाठी वेबपेज रिफ्रेश करा) LIVE अपडेट घडामोडी : - उत्तराखंडच्या या दुर्घटनेत आत्तापर्यंत २६ जणांचे मृतदेह हाती लागलेत तर अजूनही १७१ जणांचा शोध सुरू आहे. - मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावात यांनी जोशीमठाजवळ आयटीबीपी रुग्णालयात जाऊन या दुर्घटनेतील जखमींची भेट घेतली. - पुरामुळे गावांना जोडणारे चार पूल वाहून गेल्यानं आयटीबीपीचे जवान गरजेच्या गोष्टी घेऊन ग्रामस्थांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. - हेलिकॉप्टरमधून लँडींगकरून ट्रेकिंग करत हे जवान दुर्घटनाग्रस्त गावांत पोहचत आहेत. खाद्यान्न, औषधं आणि इतर गरजेच्या गोष्टी जवान ग्रामस्थांना पुरवत आहेत. - सोमवारी संपूर्ण रात्रभर सुरू होतं. बोगद्यातून मलबा काढण्यासाठी जेसीबी मशीनची मदत घेतली जातेय. तीन जेसीबी हे काम करत आहेत. - मलबा हटवण्यात आला असला तरी अद्याप आत अडकलेल्यांपैंकी कुणाशीही संपर्क होऊ शकलेला नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय. - तपोवन बोगद्यातून १२० मीटरपर्यंत मलबा बाहेर काढून रिकामा करण्यात आलाय. जास्तीत जास्त आत जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत. - आयटीबीपी आणि एनडीआरएफच्या टीम्स ऑक्सीजनसोबत इथे तैनात आहेत.