नागपूर: दारू पाजून विद्यार्थिनीवर अत्याचार, नृत्य शिक्षकाला केली अटक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, March 31, 2021

नागपूर: दारू पाजून विद्यार्थिनीवर अत्याचार, नृत्य शिक्षकाला केली अटक

https://ift.tt/2PGSM7B
म. टा. प्रतिनिधी, : नृत्य शिक्षकाने तणाव दूर करण्याच्या बहाण्याने दारू पाजून २२ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केला. ही खळबळजनक घटना भागात उघडकीस आली. अजनी पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून शिक्षकाला अटक केली आहे. रोमियो गजानन गोडबोले (वय २५), असे अटकेतील नृत्य शिक्षकाचे नाव आहे. पीडित विद्यार्थिनी मूळ वर्धा येथील रहिवासी असून, तिचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. सध्या ती स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. काही दिवसांपूर्वी तिची इन्स्टाग्रामवर गोडबोले याच्यासोबत ओळख झाली. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामुळे ती तणावात होती. गोडबोले याने तिला तणावमुक्त करण्याचे आश्वासन दिले. धुळवडीला तो तरुणीच्या फ्लॅटमध्ये गेला. तिला दारू पाजली. तरुणीने दारू प्यायली. ती मद्यधुंद अवस्थेत असताना गोडबोले याने तिच्यावर अत्याचार केला. मोबाइलमध्ये तिचे अश्लील छायाचित्र काढले. काही वेळाने तरुणी शुद्धीवर आली. अत्याचार केल्याने तिने गोडबोले याला जाब विचारला. त्याने छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी दिली. तरुणीने नागपुरातील एका नातेवाइकाला घटनेची माहिती दिली. नातेवाइकासोबत तरुणीने अजनी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचार, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून गोडबोले याला अटक केली आहे.