देशात करोना व्हायरसचा भारतीय व्हेरियंट नाही, केंद्राची माहिती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, March 31, 2021

देशात करोना व्हायरसचा भारतीय व्हेरियंट नाही, केंद्राची माहिती

https://ift.tt/3umycZt
नवी दिल्लीः देशात करोनाची दुसरी लाट आल्याचं ( ) दिसून येत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. अशातच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) संस्थेने देशात करोना व्हायरसचा एकही भारतीय व्हेरियंट समोल आला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. देशात आतापर्यंत करोना व्हायरसचा एकही व्हेरियंट आढळून आलेला नाही जो भारतीय तयार झालेला असेल, असं आयसीएमआरने म्हटलं आहे. करोनाचा व्हायरसचा कुठलाच भारतीय व्हेरियंट नाहीए. तसंच भारत सरकारने मंजुरी केलेल्या दोन्ही लसी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या ब्रिटन आणि ब्राझीलमधील करोनाच्या नवीन प्रकारांवरही प्रभावी आहे. तर दक्षिण आफ्रिकेतेली करोनाच्या नवीन प्रकाराबाबत लसीवर अद्याप काम सुरू आहे, असं आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितलं. कुठलाही व्हायरस ठिकाण बदलताना त्याच्यात बदल होत असतात. यामुळे लसीचा विचार करणं गरजेचं. कारण त्यावर कुठली लस प्रभावी ठरेल, हे बघितलं जातं, असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले. करोनाचा डबल म्युटेशन व्हेरियंट भारतात करोना व्हायरसचा एक नवीन 'डबल म्युटेंट' व्हेरियंट आढळून आला आहे. हा व्हायरस देशातील १८ राज्यांमध्ये आढळून आला आहे. यामुळे करोना व्हायरसचे जे वेगवेगळे प्रकार विविध ठिकाणी आढळून येत आहेत ते आरोग्याला अधिक हानिकारक ठरू शकतात, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. देशात करोनाचे नवीन रुग्ण वेगाने वाढत असताना केंद्राचा हा इशारा आला आहे. किती धोकादायक आहे डबल म्युटेशन व्हेरियंट? करोनाचा डबल म्युटेशन व्हेरियंट हा आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्तिपासून बचाव करतो तसंच शरीरात वेगाने पसरतो. एक सारख्या दिसणाऱ्या या व्हायरसमध्ये दोन बदल (म्युटेशन) झाले आहेत. यामुळे त्याचा धोका अधिक आहे.