नवी दिल्ली : रस्ते अपघातात सर्वात जास्त धोका असतो तो गाडीत समोरच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना... वाहनांची आपापसांत धडक झाली तर समोरच्या सीटवर बसणाऱ्यांना अनेकदा जीवही गमवावा लागतो. हीच स्थिती टाळण्यासाठी सरकारकडून आता मोटार वाहनांच्या पुढच्या सीटवर करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम किंवा त्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या सर्व वाहनांसाठी लागू होणार आहे. केंद्र सरकारकडून वाहनांच्या पुढच्या सीटवर बसून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एअरबॅग अनिवार्य केलं आहे. केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयानं शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, एअरबॅगच्या अनिवार्य तरतुदीसंबंधी गॅझेट अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 'वाहनांत चालकाच्या बाजुच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांसाठी एअरबॅग अनिवार्य करण्यासंबंधी गॅझेट अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हा एक महत्त्वपूर्ण सुरक्षित उपाय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीनं यासंबंधात सूचना दिल्या होत्या' असं मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय. मंत्रालयाच्या निर्देशानुसार, १ एप्रिल २०२१ किंवा त्यानंतर तयार होणाऱ्या वाहनांच्या पुढच्या सीटवर एअरबॅग आवश्यक असेल. तर जुन्या वाहनांसंदर्भात ३१ ऑगस्ट २०२१ पासून सध्याच्या मॉडेलपर्यंत चालकाच्या बाजुच्या सीटसोबत एअरबॅग लावण्यात लावणं अनिवार्य असेल. या नियमामुळे दुर्घटनेच्या परिस्थितीत प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित होऊ शकेल.