अर्पिताने शेअर केला सलमानचा अनसीन शर्टलेस लुक, फोटो व्हायरल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, March 6, 2021

अर्पिताने शेअर केला सलमानचा अनसीन शर्टलेस लुक, फोटो व्हायरल

https://ift.tt/3t0cE49
मुंबई: सलमान खानची बहीण सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती नेहमीच तिच्या इन्स्टाग्रामवर फॅमिली फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. आताही अर्पितानं तिच्या इन्स्टाग्रामवर सलमान सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. अर्पिता खाननं नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये अर्पिता खान भाऊ सलमान खानसोबत पोझ देताना दिसत आहे. या फोटोमध्ये शर्टलेस असल्याचं दिसत आहे. तर अर्पिता साडीमध्ये दिसत आहे. सलमानसोबतचा हा अनसीन फोटो शेअर करताना अर्पितानं लिहिलं, 'Fond Memories' सलमान खान आणि अर्पितामध्ये नेहमीच खास बॉन्डिंग पाहायला मिळतं. तो नेहमीच अर्पिता खानची मुलं आहिल आणि आयतसोबत सुद्धा दिसतो. अनेकदा तो या दोघांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. याशिवाय अर्पिता खान सुद्धा तिच्या मुलांचे सलमानसोबत खेळतानाचे किंवा धम्माल करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. जे अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. सलमा खानच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर त्याचा 'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय तो अर्पिताचा पती आयुष शर्मासोबत 'अंतिम'मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात सलमान एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे, तर आयुष शर्मा एका गँगस्टरच्या भूमिकेत आहे.