मृत्यूचे तांडव; दहशतवाद्यांकडून १३७ जणांची हत्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, March 23, 2021

मृत्यूचे तांडव; दहशतवाद्यांकडून १३७ जणांची हत्या

https://ift.tt/3tMlcMh
नियामी: आफ्रिका खंडातील देश नायजरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण गोळीबारामुळे एका गावाचे स्मशानात रुपांतर झाले. दुचाकीवरून आलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तीन तासांत १३७ जण ठार झालेत. दहशतवाद्यांनी अनेक घरांनाही आग लावली. मिळालेल्या माहितीनुसार, नायजरच्या पश्चिम भागातील टाहौआतील इंटाजेने, बॅकोरेट आणि अन्य ठिकाणच्या गावांमध्ये रक्ताचे पाट वाहिले. हा भाग माली देशाच्या सीमेजवळ आहे. सध्या तरी या दहशतवादी हल्ल्याची कोणत्याही संघटनेने जबाबदारी घेतली नाही. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६०जणांच्या मृत्यू झाल्याची पु्ष्टी करण्यात आली आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जवळपास १३७ जण ठार झाले आहेत. वाचा: वाचा: पश्चिम नायजर भागात मागील काही वर्षांपासून दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. मागील काही दिवसांपूर्वीही जवळपास ६६ जणांची हत्या करण्यात आली होती. सुरक्षा दलाच्या जवानांसह सामान्य नागरिकांवरही हल्ले करण्यात येत आहे.