आशियाई नागरिकांवर हल्ले; न्यूयॉर्क, शिकागोमध्ये हजारोंची निदर्शने - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, March 29, 2021

आशियाई नागरिकांवर हल्ले; न्यूयॉर्क, शिकागोमध्ये हजारोंची निदर्शने

https://ift.tt/3u3WreI
न्यूयॉर्क: अमेरिकेत मागील काही दिवसांपासून आशियाई वंशाच्या नागरिकांवर होत असलेल्या वर्णद्वेषी हल्ल्याचे पडसाद अमेरिकेत उमटू लागले आहेत. वर्णद्वेषी हल्ल्याविरोधात न्यूयॉर्क, शिकागोमध्ये हजारोजणांनी निदर्शने केली. मागील काही दिवसांमध्ये आशियाई वंशांच्या नागरिकांवर हल्ले झाले आहेत. एका हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता. शिकागो येथील चायना टाऊन स्क्वेअरमध्ये वर्णद्वेष आणि गुन्ह्यांविरोधात हजारोजण रस्त्यावर उतरली. यावेळी निदर्शकांच्या हातात वर्णद्वेषी हल्ल्याविरोधातील फलक होते. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी वर्णद्वेष आणि त्यातून होणारे हल्ले प्रभावीपणे रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले. वाचा: अटलांटामध्ये १६ मार्च रोजी आठजणांची हत्या करण्यात आली होती. यामध्ये सहा आशियाई वंशाच्या महिला होत्या. त्यानंतर वर्णद्वेषाच्या काही घटना समोर आल्या होत्या. आंदोलकांनी यावेळी सुरक्षा व्यवस्था वाढवणे, वर्णद्वेषातून होणाऱ्या हिंसाचाराची तक्रार देण्यासाठी नवीन संकेतस्थळ सुरू करणे, हिंसाचारग्रस्तांसाठी फंड सुरू, वर्णद्वेषाच्या मुद्यावर तात्काळ कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. वाचा: न्यूयॉर्कमध्ये वर्णद्वेषाविरोधात आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात २५ राज्यातील ६० हून अधिक शहरातील नागरिकांचे प्रतिनिधीत्व होते. न्यूयॉर्कमध्ये वर्णद्वेषी हल्ल्यानंतर १० हून अधिक निषेध मोर्चे आयोजित करण्यात आले आहेत. सिएटलसह इतर राज्यांमध्येही वर्णद्वेषाविरोधात आंदोलन करण्यात आले.