'स्कॅनिया'च्या भागीदाराशी मोदींचा संबंध, काँग्रेसचा आरोप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, March 13, 2021

'स्कॅनिया'च्या भागीदाराशी मोदींचा संबंध, काँग्रेसचा आरोप

https://ift.tt/3t8MV9w
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : स्वीडनची बस कंपनी ''चे भारतीय भागीदार सिद्धीविनायक लॉजिस्टिक्स लिमिटेडचे () रूपचंद बैद यांनी ८३६ कोटी रुपयांचे कर्ज बुडवून ''ची फसवणूक केली असून, त्यांच्याशी आपले काय संबंध आहेत हे यांनी स्पष्ट करावे अशी मागणी काँग्रेसने शुक्रवारी केली. 'बँक ऑफ महाराष्ट्रा'चे सर्वाधिक कर्ज 'एसव्हीएलएल'ने बुडविले. सुरतमध्ये २०१२मध्ये 'एसव्हीएलएल'ला 'चालक से मालक' योजना सुरू करण्यासाठी गुजरातमधील 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या विभागीय कार्यालयाने मुख्यालयाची परवानगी न घेता ८३६ कोटींचे कर्ज दिले, असे आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा यांनी पत्रकार परिषदेत केला. केंद्रीय मंत्री यांच्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हे आरोप तथ्यहीन आणि बिनबुडाचे असल्याचे निवेदन करावे, असे आव्हान काँग्रेसने दिले आहे. 'एसव्हीएलएल'चे बैद मोदी यांच्या खास मर्जीतील आहेत. त्यांच्या 'एसव्हीएलएल'ने २०१४मध्ये मोदी यांना निवडणूक प्रचारासाठी अलिशान बस पुरविल्या, असा आरोपही खेडा यांनी केला आहे. १९ वर्षांपूर्वी सूरतचे व्यापारी यांनी अहमदाबादमध्ये स्थापन केलेली सिद्धी विनायक लॉजिस्टिक्स लिमिटेड (एसव्हीएलएल) ही कंपनी सध्या चर्चेत असलेल्या स्वीडनच्या स्कानिया बस कंपनीची भारतीय भागीदार आहे असा दावाही खेडा यांनी केला आहे.