संग्राम समेळ दुसऱ्यांदा विवाहबंधनात; 'या' अभिनेत्रीसोबत झालं होतं पहिलं लग्न - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, March 11, 2021

संग्राम समेळ दुसऱ्यांदा विवाहबंधनात; 'या' अभिनेत्रीसोबत झालं होतं पहिलं लग्न

https://ift.tt/30vE71p
मुंबई: गेल्या काही महिन्यात मराठी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकले आहेत. या यादीत आता आणखी एका अभिनेत्याचं नाव दाखल झालं आहे. अभिनेता हा नुकतात विवाहबंधनात अडकला. त्याच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रसिद्ध कोरिओग्राफर हिच्याशी संग्रामनं लग्नगाठ बांधली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत संग्राम आणि श्रद्धाचा विवाहसोहा इचलकरंजी इथं पार पडलाय संग्राम आणि श्रद्धाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पहिलं लग्न ठरलं अयशस्वीसंग्रामचं हे दुसरं लग्न आहे. त्यानं २०१६ मध्ये अभिनेत्री हिच्या सोबत लग्न केलं होतं. परंतु त्यांचं लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. संग्रामच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो 'पुढचं पाऊल' या मालिकेतून घराघरांत पोहोचला. मालिकेतली 'समीर' या व्यक्तीरेखेनं त्याला ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्याने 'एकच प्याला' , 'कुसुम मनोहर लेले'या नाटकांत काम केलं. तसंच ललित 205, हे मन बावरे, या मालिकांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विकी वेलिंगकर, स्वीटी सातारकर, ब्रेव हार्ट (जिद्द जगण्याची) या चित्रपटांतही त्यानं काम केलं आहे.