ताजमहालमध्ये बॉम्ब? अज्ञान फोननंतर सुरक्षा यंत्रणेची धावपळ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, March 4, 2021

ताजमहालमध्ये बॉम्ब? अज्ञान फोननंतर सुरक्षा यंत्रणेची धावपळ

https://ift.tt/3851x1t
: उत्तर प्रदेशातील आग्रास्थित ऐतिहासिक वारसा ताजमहालमध्ये आज सुरक्षा यंत्रणांची एकच धावपळ उडाली. गुरुवारी एका अज्ञात फोन कॉलनंतर ताजमहालमध्ये पर्यटकांसाठी तत्काळ बंद करण्यात आलं. ताजमहालच्या आत ठेवण्यात आल्याची सूचना सुरक्षा यंत्रणांना एका अज्ञात फोन कॉलवरून मिळाली होती. त्यानंतरी सीआयएसएफ आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या जवानांनी ताजमहालमध्ये उपस्थित असलेल्या पर्यटकांना तातडीनं बाहेर काढलं. तसंच ताजमहालचे दरवाजे बंद करण्यात आले. स्फोटकांची सूचना देण्याचा फोन कुणी आणि कोणत्या हेतूने दिला होता? याचा तपास करत आहे. स्फोटकांच्या सूचना देणाऱ्या फोननंतर सुरक्षा यंत्रणेकडून संपूर्ण परिसराची झाडाझडती घेण्यात येतेय. या प्रकरणात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.