कोलराडो: अमेरिकेच्या कोलराडो राज्यातील एका झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोलराडोच्या बॉल्डर भागातील सुपरमार्केटमध्ये एका अज्ञाताने गोळीबार केला. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह १० जण ठार झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संशयित हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुपरमार्केटमधून पोलिसांनी एका संशयित व्यक्तिला बेड्या घालून बाहेर काढले. हा संशयित जखमी असल्याचे दिसून आले. बॉल्डर पोलीस कमांडर केरी यामागुची यांनी सांगितले की, या संशयित आरोपीवर उपचार सुरू आहेत. या गोळीबाराचे कारण आणि मृतांची संख्या अधिकृतपणे सांगण्यास नकार दिला. वाचा: बॉल्डर कौंटी जिल्ह्याचे अॅटर्नी मायकल डोगर्टी यांनी सांगितले की, या घटनेत किती जणांचा मृत्यू झाला हे तपास करणाऱ्यांना ठाऊक असल्याचे त्यांनी सांगितले. मृतांच्या कुटुंबीयांना त्याबाबतची माहिती देण्यात आली आहे. ही अतिशय धक्कादायक घटना असल्याचेही त्यांनी सांगितले. वाचा: वाचा: गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर त्या ठिकाणाहून जीव वाचवण्यासाठी तेथून बाहेर पडलो असल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. त्या दरम्यान, तीनजण सुपरमार्केटमध्ये, दोनजण पार्किंग भागात आणि एकजण दरवाजात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मात्र ते जिवंत होते की मृत झालेले हे सांगता येणार नसल्याचेही या प्रत्यक्षदर्शीने सांगितले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर सुपरमार्केट बाहेर मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहे. गोळीबार सुरू असताना सुपरमार्केटच्या छतावर पोलिसांचे तीन हेलिकॉप्टर लँड झाले होते.