करोना : देशात एका दिवसात १६,८३८ रुग्णांची भर तर १३ लाखांचं लसीकरण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 5, 2021

करोना : देशात एका दिवसात १६,८३८ रुग्णांची भर तर १३ लाखांचं लसीकरण

https://ift.tt/3e7Ncp2
नवी दिल्ली : देशात करोना संक्रमणाविरुद्ध सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत असल्याचं दिसून येतंय. शुक्रवारी सकाळी आरोग्य विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गुरुवारी एका दिवसात जवळपास १७ हजार रुग्ण आढळले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या २४ तासांत देशभरात १३ लाख ८८ हजार १७० नागरिकांना देण्यात आल्याचं, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय. शुक्रवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत एकूण १६ हजार ८३८ नवे करोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत देशातील आत्तापर्यंत करोना संक्रमित १ कोटी ११ लाख ७३ हजार ७६१ वर पोहचली आहे. याच २४ तासांत जवळपास ११३ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. देशात आतापर्यंत एकूण १ कोटी ५७ हजार ५४८ जणांनी करोनामुळे आपला जीव गमावलाय. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १३ हजार ८१९ रुग्णांनी करोनावर मात केली. आतापर्यंत देशात तब्बल १ कोटी ०८ लाख ३९ हजार ८९४ रुग्ण या धोकायदायक विषाणूवर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. रिकव्हरी रेट : ९७.०१ टक्केअॅक्टिव्ह रुग्णसंख्या : १.५८ टक्के दर : १.४१ टक्के इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ४ मार्चपर्यंत २१.९९ कोटी नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील ७.६१ लाख करोना चाचण्या गुरुवारी पार पडल्या.