अभिनेत्री तापसी पन्नूकडे आहे 'इतकी' संपत्ती; अनुराग कश्यपने तर... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 5, 2021

अभिनेत्री तापसी पन्नूकडे आहे 'इतकी' संपत्ती; अनुराग कश्यपने तर...

https://ift.tt/3qcociQ
मुंबई- चित्रपटसृष्टीत गेले काही दिवस अनेश धक्कादायक घटना घडत आहेत. आयकर विभागाने बॉलिवूडमधील काही कलाकारांच्या घरावर आणि कामाच्या ठिकाणांवर छापे टाकले. मुंबई आणि पुण्यात मिळून चार कलाकारांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली. यामध्ये अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि मधू मंटेना यांचा समावेश आहे. या कारवाईमध्ये आणि या दोघांकडे मिळकतीपेक्षा जास्त संपत्ती सापडली आहे. सोशल मीडियावर सध्या या प्रकाराची जोरदार चर्चा सुरु आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्याकडे सगळ्यात जास्त संपत्ती सापडल्याचं बोललं जात आहे. अनुरागकडे ८०६ कोटींची संपत्ती सापडली आहे तर अभिनेत्री तापसीकडे ४४ कोटींची संपत्ती असल्याचं समोर आलंय. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, तापसी तिच्या अभिनयाच्या जोरावर दरवर्षी जवळपास ४ कोटी रुपये कमावते. याचाच अर्थ तिची महिन्याची मिळकत ३ लाख एवढी आहे. २०१९- २०२० पर्यंत ती एका चित्रपटासाठी १ ते २ कोटी रुपये मानधन घेत होती. परंतु, सध्या एका चित्रपटासाठी तापसी ८ कोटी रुपये मानधन घेत असल्याचं कळतं. तापसीने सुरुवातीची काही वर्ष तेलगू चित्रपटांमध्ये काम केलं. त्यानंतर तिने 'चश्मे बहादुर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तापसीने आजपर्यंत अनेक हिट चित्रपटात काम केलं आहे. अनुरागच्या संपत्तीबद्दल सांगायचं तर, एका चित्रपटासाठी अनुराग जवळपास ११ कोटी रुपये मानधन घेतो. एका वर्षात तो ६० कोटींपेक्षा जास्त रुपये कमावतो. यानुसार महिन्याला ६ कोटींहून अधिक मानधन कमावतो. अनुरागकडे ४ कोटींची एक गाडी आहे. एवढ्या मिळकतीवर तो प्रत्येक वर्षाला ९.८ कोटी रुपये कर भरतो. अनुराग कश्यप याने 'ब्लॅक फ्रायडे', 'गुलाल', 'नो स्मोकिंग', 'देव डी', 'गॅंग ऑफ वासेपूर' या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.