इस्लामाबाद: आर्थिक अरिष्टाच्या संकटात अडकलेल्या पाकिस्तानला मोठा दिलासा मिळाला आहे. करोना महासाथीच्या आजाराशी दोन हात करण्यासाठी पाकिस्तानला ४.५ कोटी करोना लशीचे डोस मिळणार आहे. करोना लशीचे डोस भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने उत्पादित केल्या आहेत. 'गावी'च्या माध्यमातून पाकिस्तानला या लशी मिळणार आहेत. पाकिस्तानचे राष्ट्रीय आरोग्य सेवेचे सचिव आमिर अशरफ ख्वाजा यांनी सांगितले की, पाकिस्तानला भारतात बनवण्यात आलेली या महिन्यात मिळणार आहे. पाकिस्तानमध्ये याआधी चीनने दिलेल्या करोना लशीने लसीकरण कार्यक्रम सुरू आहे. आतापर्यंत २७.५ दशलक्ष लोकांना करोनाची लस देण्यात आली असल्याची माहिती ख्वाजा यांनी दिली. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. वाचा: पाकिस्तान सरकारनने याआधीच यावर्षी एकही लस खरेदी करणार नसल्याचे म्हटले होते. करोनाशी लढण्यासाठी पाकिस्तान हर्ड इम्युनिटी आणि चीन व कोवॅक्सकडून मदत म्हणून मिळणाऱ्या लशीवर अवलंबून असणार आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात असून मागील काही वर्षांमध्ये कर्जाच्या रक्कमेत वाढ झाली आहे. पाकिस्तानच्या नागरिकांवर दरडोई एक लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज आहे. यापैकी ४६ टक्के कर्ज हे इम्रान खान सत्तेवर आल्यानंतर वाढले आहे. वाचा: करोनाविरोधातील लशीकरण मोहिमेतून गरीब, विकसनशील देश वंचित राहू नये यासाठी कोवॅक्सची योजना तयार करण्यात आली आहे. कोवॅक्समध्ये जागतिक आरोग्य संघटनेसह जगातील ६० टक्के बालकांसाठी लसीकरण मोहीम राबवणाऱ्या GAVI मध्ये सार्वजनिक-खासगी संस्थांचा सहभाग आहे. GAVI या संस्थेला बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशनकडून मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात येतो.