
मुंबई- अभिनेत्री आणि निर्माती लवकरच तिची अपकमिंग वेब सीरिज 'बॉम्बे बेगम्स'मधून अभिनय क्षेत्रात पुनरागमन करत आहे. दरम्यान ही वेब सीरिज रिलीज होण्याआधी दिलेल्या एका मुलाखतीत पूजानं तिच्या पहिल्या चित्रपटाच्या वेळी एका रोमँटिक सीनदरम्यान नर्वस झाल्यावर वडील यांनी तिला काय सल्ला दिला होता याचा खुलासा केला. पूजा म्हणाली, 'निरागसता सुद्धा तुम्हाला योग्य प्रकारे मांडता आली पाहिजे हा पहिला धडा होता जो मी अनेक वर्षांपूर्वी 'सडक'च्या सेटवर शिकले. मला त्यावेळची स्टार अभिनेता संजय दत्तसोबत किसिंग सीन द्यायचा होता. त्यावेळी मी केवळ १८ वर्षांची होते आणि मला अशा व्यक्तीसोबत किसिंग सीन करायचा होता. ज्याचे पोस्टर्स मी माझ्या बेडरुममध्ये लावले होते.' पूजा पुढे म्हणाली, 'मला आठवतं माझे वडील मला एका बाजूला घेऊन गेले आणि त्यांनी मला असं काही सांगितलं जे मला आयुष्यभर लक्षात राहिलं. ते मला म्हणाले, जर तुला यात वल्गरपणा जाणवत असेल तर ते वल्गरच दिसेल. म्हणून तुला किसिंग सीन किंवा लव्ह मेकिंग सीन सुंदर आणि निरागसपणे देता यायला हवा. कारण तो लोकांच्या मनाला भावला पाहिजे.' पूजानं २०२० मध्ये रिलीज झालेल्या 'सडक २'मध्ये स्पेशल अपियरन्स दिला होता. पण आता 'बॉम्बे बेगम्स'मधून ती खऱ्या अर्थानं अभिनय क्षेत्रात पुनरागमन करत आहे. ज्यात ती एका सीईओची भूमिका साकारत आहे. 'बॉम्बे बेगम्स' हा ६ भागांचा नेटफ्लिक्स ड्रामा आहे. ज्याचं दिग्दर्शन अलंकृता श्रीवास्तवनं केलं असून या सीरिजमध्ये शहाना गोस्वामी, प्लबिता बोरठाकुर आणि अमृता सुभाष या अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ८ मार्च महिला दिनाच्या निमित्तानं ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.