मनसुख हिरन प्रकरणी निलंबित पोलीस कॉन्स्टेबलसह दोघांना अटक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, March 21, 2021

मनसुख हिरन प्रकरणी निलंबित पोलीस कॉन्स्टेबलसह दोघांना अटक

https://ift.tt/3r0JRLe
मुंबई: मनसुख हिरन मृत्यू प्रकरणाचा तपास ''कडे सोपवण्यात आला असला तरी, या प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने () दोघांना अटक केली आहे. यात एका निलंबित पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असून, दुसरा अटक केलेला संशयित आरोपी सट्टेबाज असल्याची माहिती मिळते. त्यांना आज ठाणे कोर्टात हजर करण्यात येणार आहे. नरेश धरे (वय ३१) आणि विनायक शिंदे (वय ५५) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. धरे हा बुकी आहे. तर शिंदे हा निलंबित पोलीस कॉन्स्टेबल आहे. शिंदे हा लखनभय्या बनावट चकमक प्रकरणातील आरोपी असून, काही दिवसांपूर्वीच तो पॅरोलवर बाहेर आला होता. या दोघांना स्थानिक कोर्टात हजर करण्यात येणार असून, त्यांच्या कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे मनसुख हिरन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसमार्फत करण्यात येत होता. मात्र, आता हा तपास एनआयए करणार आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळील रस्त्याच्या कडेला स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. त्यामुळे खळबळ उडाली होती. या कारचे मालक मनसुख हिरन असल्याचे समोर आल्यानंतर त्या दिशेने तपास सुरू होता. मात्र, ५ मार्च रोजी हिरन यांचा मृतदेह ठाण्यातील कळवा खाडीत सापडला होता. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण लागले. मनसुख मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसमार्फत करण्यात येत होता. मात्र, आता हा तपास एनआयएकडे सोपवण्यात आलेला आहे.