सुएझ: जगातील व्यस्त जलवाहतूक मार्ग असलेल्या मार्ग जवळपास ठप्प झाला होता. 'एव्हर गिव्हन' हे मालवाहू जहाज वादळामुळे भरकटल्यामुळे सुएझ कालव्यात अडकले. त्यामुळे या मार्गातील जलवाहतूक ठप्प झाली होती. या घटनेसाठी जहाजावरील भारतीय चालक दलाला बळीचा बकरा बनवला जात असल्याची चर्चा सुरू आहे. भारतीय चालक दलात २५ जणांचा समावेश असून सध्या ते नजरकैदेत आहेत. इजिप्त सरकार त्यांना अटक करण्याची शक्यता आहे. एव्हरग्रीन कंपनीचे 'एव्हर गिव्हन' जहाजाची सहा दिवसानंतर सुटका करण्यात आली. सुएझ कालव्यात झालेल्या कोडींची चौकशी करण्यात आली. जहाज अडकण्यामागे हवामान जबाबदार नसून मानवी अथवा तांत्रिक चूक जबाबदार असल्याचे चौकशी समितीने अहवालात म्हटले आहे. इजिप्त सरकारकडून जहाज अडकण्याची आणि झालेल्या नुकसानीची चौकशी सुरू आहे. मात्र, या संभाव्य कारवाईमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वाचा: जहाजावरील भारतीय नजरकैदेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुएझ कोंडीचा ठपका २५ सदस्यीय भारतीय चालक दलावर फोडण्यात येत आहे. मात्र, तपास पूर्ण होईपर्यंत भारतीय चालक दलाला नजरकैदेत ठेवण्यात आले असल्याचे वृत्त आहे. लवकरच इजिप्त सरकार या चालक दलाला अटक करू शकते. त्यामुळे या भारतीयांना तुरुंगवासाची होऊ शकते. वाचा: वाचा: भारतीय कर्मचाऱ्यांवर कारवाई चुकीची प्रकरणी भारतीय चालक दलावर कारवाई होत असल्यास ती चुकीची असल्याचे 'फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडिया'चे सरचिटणीस मनोज यादव यांनी म्हटले. सुएझ कालव्यातील नियमांनुसार, सुएझ कालव्यातून मालवाहू जहाज बाहेर काढण्यासाठी प्राधिकरणाच्या पायलटवर त्याची जबाबदारी असते. त्यामुळे पायलट जहाजावर आल्यानंतर जहाजाच्या क्रूची जबाबदारी नसते. भारतीय कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले जात असल्याचा संशय यादव यांनी व्यक्त केला. कोणत्या आधारावर हा अपघात मानवी चूक आहे असे म्हटले जात आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. भारतीय चालकांवर दोष ढकलून सुएझ प्राधिकरण आणि जहाज कंपनी सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. भारतीय कर्मचाऱ्यांसोबत संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
https://ift.tt/2PMZtVB