फुकट रेल्वे प्रवासासाठी लोक काय-काय करतात माहित्येय? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, March 14, 2021

फुकट रेल्वे प्रवासासाठी लोक काय-काय करतात माहित्येय?

https://ift.tt/3lc3Xkv
म. टा. प्रतिनिधी, मुंबई मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने १५ जून २०२० ते २८ फेब्रुवारीपर्यंत आणि मेल एक्स्प्रेसवर कारवाईमधील विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करत ७.६१ कोटींचा दंड वसूल केला आहे. मध्य रेल्वेने केलेल्या तपासणीत विना तिकीट प्रवास करणाऱ्या २.३८ लाख प्रवाशांकडून ही वसुली केली. यापैकी सुमारे १.७५ लाख प्रकरणे लोकलमधील असून, त्यांच्याकडून ५.१० कोटी वसूल करण्यात आले. मेल एक्स्प्रेसमधील ६३ हजार प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करत २.५१ कोटी दंड वसूल करण्यात आला. वाचा: ज्येष्ठ नागरिक कोट्याचा दुरुपयोग, बदललेल्या तिकिटावर प्रवास करणे, सिस्टीमद्वारे उत्पन्न तिकिटांचे ई-तिकिटांमध्ये रूपांतर करणे, तिकिटांच्या रंगीत झेरॉक्सने प्रवास करणे, बनावट ओळखपत्रांसह प्रवास करणे, तिकिटांचे हस्तांतरण करण्याची प्रकरणे असे प्रकार मेल-एक्स्प्रेसमध्ये घडत असल्याचे प्रकार यावेळी समोर आले. प्रवाशांनी योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन करीत आहे.