आत्महत्येपूर्वी व्हिडिओ बनवून घेतला गळफास; पोलीस अधिकाऱ्यावर आरोप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, March 2, 2021

आत्महत्येपूर्वी व्हिडिओ बनवून घेतला गळफास; पोलीस अधिकाऱ्यावर आरोप

https://ift.tt/3raJLBz
नाशिक: पोलीस अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून करत असल्याचा व्हिडिओ बनवून तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना शहरातील परिसरात घडली आहे. रात्री उशिरा राहत्या घरी त्याने गळफास घेतला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ तयार केला होता. भद्रकाली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. वराडे यांनी मानसिक त्रास दिल्याने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख त्याने व्हिडिओत केला आहे. या तरुणावर अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात पोलीस आयुक्त काय कारवाई करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तरुणाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात असून, नातेवाइक मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत आहेत. यामुळे काही वेळ त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता.