WHO म्हणते की, लशीमुळे करोनाला अटकाव, पण... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, March 2, 2021

WHO म्हणते की, लशीमुळे करोनाला अटकाव, पण...

https://ift.tt/380lhU8
जिनिव्हा: करोनाला संसर्गाला रोखण्यासाठी जगातील अनेक देशांमध्ये लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. लसीकरणामुळे करोनापासून सुटका होणार असल्याचे म्हटले जात असले तरी जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे. लसीकरणामुळे बाधितांची आणि मृतांच्या संख्येत घट होईल. मात्र, या वर्षाखेरपर्यंत तरी करोनापासून सुटका होईल असे समजणे चुकीचे ठरणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन कार्यक्रमाचे संचालक डॉ. मायकल रायन यांनी सांगितले की, जगातील देशांनी करोना विषाणूचे संक्रमण रोखण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जर आपण सतर्क असू तर वर्षाखेरपर्यंत करोनामुळे रुग्णालयात दाखल होणारे बाधित, त्यांचा मृत्यू आणि महासाथीच्या आजारामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा अंत करू शकतो. वाचा: डॉ. रायन म्हणाले की, मंजुरी मिळालेल्या लसींच्या चाचणीच्या आकडेवारीच्या आधारे या लशी विषाणूंचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावण्यापासून रोखता येऊ शकतो, अशी खात्री जागतिक आरोग्य संघटनेला आहे. करोना लशीमुळे करोनाबाधितांचे मृत्यू थांबवले जाऊ लागले आणि संसर्ग रोखला जाऊ लागला तर या महासाथीच्या आजारावर लवकरच नियंत्रण मिळवण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना वेग येईल, असे त्यांनी म्हटले. वाचा: वाचा: करोनाचा आजार सध्या नियंत्रणात असला तरी महासाथीचा आजार लशीमुळे पूर्णपणे जाईल, असे समजणे चुकीचे ठरू शकेल, असा इशाराही त्यांनी दिला. जागतिक आरोग्य संघटनेच्या कोवॅक्स लसीकरण योजनेतंर्गत घाना आणि आयवरी कोस्ट या देशांमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले आहे.