धक्कादायक! धावत्या ट्रेनमध्ये श्वेतवर्णीयाने आशियाई महिलेवर केली लघुशंका - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, March 23, 2021

धक्कादायक! धावत्या ट्रेनमध्ये श्वेतवर्णीयाने आशियाई महिलेवर केली लघुशंका

https://ift.tt/3f2VwH7
न्यूयॉर्क: अमेरिकेत मागील काही महिन्यांपासून वर्णद्वेषाच्या घटना वाढीस लागल्या आहेत. एका पाठोपाठ अनेक घटना समोर येत असून एका आशियाई महिलेला एका घृणास्पद घटनेला सामोरे जावे लागले. न्यूयॉर्क सिटी सब वे कारमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या अंगावर आणि तिच्याजवळ असणाऱ्या वस्तूंवर लघुशंका केली. ही संतापजनक घटना सुरू असताना एकाही प्रवाशाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. ही घटना शनिवारी दुपारी घडली. आशियाई वंशाची महिला उत्तरेच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसली होती. त्याच वेळी मास्क आणि काळ्या रंगाचा कपडा घातलेली एक व्यक्ती महिलेच्या आसनाजवळ आली आणि महिलेच्या जवळ बसला. महिलेने 'एशियनफीड'ला सांगितला, मी आपल्या उजव्या बाजूला पाहिले. त्यावेळी आरोपीने आपले गुप्तांग बाहेर काढले आणि माझ्या अंगावर आणि सोबत असलेल्या वस्तूंवर लघुशकां करण्यास सुरुवात केली. वाचा: वाचा: महिलेने सांगितले की, ही घटना घडली त्यावेळी इतरही प्रवासी होते. मात्र, एकाही प्रवाशाने त्याला विरोध केला नाही. आरोपी हा श्वेतवर्णीय होता आणि त्याचे वय ६० वर्षाच्या आसपास असावे अशी माहिती या महिलेने दिली. हा आरोपी ७५ एवन्यू स्टेशनवर ट्रेनमधून उतरला. पीडित महिलेने आरोपीचा फोटो काढला. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. या घटनेच्या एक दिवस आधीच मॅनहॅटनमध्ये एका श्रीलंकन वंशाच्या व्यक्तीवर हल्ला करण्यात आला होता.