मुंबई : शंभरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पेट्रोल दरात आज कोणताही बदल झाला नाही. सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी ठेवले. या निर्णयाने ग्राहकांना तूर्त दिलासा मिळाला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी याआधी काल सोमवारी आणि रविवारी इंधन दर स्थिर ठेवले होते. तर शनिवारी पेट्रोल २४ पैसे आणि डिझेल १७ पैशांनी महागले होते. त्याआधी सलग तीन दिवस इंधन दर स्थिर ठेवले होते. जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी असल्याने कंपन्यांसाठी तेलाची आयात खर्चिक बनली आहे. दरम्यान,इंधन दर स्थिर असल्याने आज मंगळवारी मुंबईत पेट्रोल ९७.५७ रुपयांवर कायम आहे. एक लीटर डिझेलचा भाव ८८.६० रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९१.१९ रुपये आहे. डिझेलचा भाव ८१.४७ रुपये आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९३.१७ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८६.४५ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोल ९१.३५ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८४.३५ रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९४.२२ रुपये असून डिझेल ८६.३७ रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८९.७६ रुपयांचा विक्रमी दर आहे. भोपाळमध्ये आज पेट्रोलचा दर ९९.२१ रुपये आहे. अमेरिकेने १.९ लाख कोटी डॉलर्सच्या आर्थिक पॅकेजला मंजुरी दिली आहे. यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. आज सिंगापूरमध्ये कच्च्या तेलाच्या किमती ०.५७ डॉलरची घसरण झाली. तेलचा भाव ६०.०७ डॉलर प्रती बॅरल झाला. तर ब्रेंट क्रूडमद्ये ०.७३ डॉलरची घसरण झाली आणि तेलाचा भाव ६३.६९ डॉलर झाला.