पुणे : घरकामगार तरुणीची आत्महत्या; तपास सुरू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, March 8, 2021

पुणे : घरकामगार तरुणीची आत्महत्या; तपास सुरू

https://ift.tt/3sZAQUc
म. टा. प्रतिनिधी, हडपसर हडपसर पांढरे मळा येथे राहणारी एका तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून केल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडला, ही घटना हडपसर येथील अग्रवाल गंगा रेसीडेन्सी या इमारतीच्या ठिकाणी घडली, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीला शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी तत्काळ रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले. तब्बू शेख (वय १९, रा. पांढरेमळा, हडपसर) असे तरुणीचे नाव आहे. आत्महत्यांचे कारण समजू शकले नाही. याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सागर पोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बू शेख गंगा रेसिडन्सी सोसायटीत घरकामगार म्हणून काम करीत होती. रविवारी तिने सोसायटीच्या गच्चीवर जाऊन खाली उडी मारली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. आजूबाजूच्या नागरिकांनी काय पडले, असे म्हणून धाव घेतली, तेव्हा तब्बूला गंभीर जखमी पाहून नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवले. तिला उचलून जवळील रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले, त्यानंतर तिला घटनेची माहिती घेतली. त्यानंतर ससून रुग्णालयात तिला पाठवण्यात आले. घटनास्थळी पोलिसांनी जाऊन घटनेची माहिती घेतली.