MPSC पूर्व परीक्षा २१ मार्च रोजी; आयोगाने केलं जाहीर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 12, 2021

MPSC पूर्व परीक्षा २१ मार्च रोजी; आयोगाने केलं जाहीर

https://ift.tt/3tiaLzX
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० ही रविवार २१ मार्च रोजी होणार आहे. आयोगाने संकेतस्थळावर यासंदर्भातील परिपत्रक जारी केलं आहे. दुसरीकडे, आंदोलनकर्त्या उमेदवार मात्र ही परीक्षा १४ मार्चलाच घेतली जावी या मागणीवर ठाम आहेत. आयोगाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की ही परीक्षा ११ मार्चच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा आता रविवार २१ मार्च रोजी होणार आहे. उमेदवारांना १४ मार्च २०२१ च्या परीक्षेसाठी जी प्रवेशपत्रे जारी केली होती, त्याच प्रवेशपत्रांच्या आधारे २१ मार्चच्या परीक्षेला प्रवेश देण्यात येणार आहेत. अभियांत्रिकी आणि दुय्यम सेवा राजपत्रित परीक्षेत बदल नाही महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० शनिवारी २७ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० रविवार ११ एप्रिल २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या दोन्ही परीक्षा नियोजित वेळेतच घेतल्या जातील, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.