भयंकर! बहिणीने पळून जाऊन लग्न केले, संतापलेल्या भावाने मेहुण्याचे शिर कापले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 12, 2021

भयंकर! बहिणीने पळून जाऊन लग्न केले, संतापलेल्या भावाने मेहुण्याचे शिर कापले

https://ift.tt/38uCuFC
भोपाळ/ : मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. बहिणीचा प्रेमविवाह झाल्याने संतापलेल्या भावाने तिच्या पतीची कुऱ्हाडीचे घाव घालून केली. शिर कापले. त्यानंतर ते घेऊन तो पोलीस ठाण्यात हजर झाला. आपल्या पतीची हत्या झाल्याचे समजल्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. जबलपूरच्या तिलवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. अचानक एक व्यक्ती गोणीमध्ये कापलेले शिर घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली. त्या व्यक्तीने आपल्या कृत्याची कबुली दिली. बृजेश नावाच्या तरुणाची हत्या केली असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या घटनेने पोलीसही हादरले. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार पोलीस शेतात पोहोचले. तेथून मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली. धीरज शुक्ला असे आरोपीचे नाव आहे. त्याची कसून चौकशी सुरू केली. त्याची गेल्या अनेक वर्षांपासून बृजेश नावाच्या तरुणासोबत मैत्री होती. काही महिन्यांपूर्वी बृजेशने धीरजच्या बहिणीसोबत पळून जाऊन लग्न केले होते. तेव्हापासून धीरज नाराज होता. त्याने गुरुवारी बृजेशची हत्या केली. बहिणीनेही केली आत्महत्या बृजेशची हत्या झाल्याचे समजताच, आरोपी धीरजची बहीण आणि बृजेशच्या पत्नीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली. पूजाचा मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तिचाही मृत्यू संशयास्पद असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.