वॉशिंग्टन: मंगळावर मानवी वस्ती वसवण्यासाठी उद्योजक एलन मस्क यांचे प्रयत्न सुरू आहे. त्यादृष्टीने बुधवारी मस्क यांची कंपनी स्टारशिय एसएन१० ने पहिल्यांदाच जवळपास ८ मैलपर्यंत अवकाशात उड्डाण घेतले. पृथ्वीवर लँडिंग केल्यानंतर १० मिनिटांत रॉकेटचा भीषण स्फोट झाला आणि लाँचपॅडवरच जळून खाक झाले. स्पेसएक्सच्या टीमने ही चाचणी यशस्वी झाल्याचे जाहीर केल्यानंतर अवघ्या काही क्षणात रॉकेटचा स्फोट झाला. स्पेसएक्सचे रॉकेट एसएन१० ने उड्डाण घेतले आणि सुखरूपपणे लँडिंग केले. एसएन १० रॉकेट पृथ्वीपासून ६ मैल उंचीवर गेले. त्यानंतर लाँचपॅडवर लँडिंग केल्यानंतर १० मिनिटांतच आधीचे प्रोटोटाइप एसएन८ आमि एसएन९ प्रमाणेच आगीत भस्मसात झाले. वाचा: वाचा: वाचा: मिथेन गॅसच्या गळतीमुळे आग? एसएन १० रॉकेटमध्ये झालेल्या स्फोटाचे कारण अद्याप समोर आले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉकेटचे लँडिंग लेग बेसशी जोडले गेले नव्हते. त्यामुळे रॉकेट स्थिर नव्हते. तर, अन्य काहींच्या मते रॉकेटमधून मिथेन गॅसची गळती झाली, त्यामुळे हा अपघात झाला. हे रॉकेट टेक्सास येथील स्पेसएक्सच्या बोका चिकामधून उड्डाण केले होते. एसएन८ आणि एसएन९ रॉकेटचा लँडिंग करताना स्फोट झाला होता. एसएन १० मध्ये तीन इंजिन लावण्यात आले होते. अंतराळात जाताना यातील दोन इंजिन वेगळे झाले. मात्र, चार मिनिटांत एसएन१० रॉकेटने ६ मैल उंच उड्डाण घेतले. काही वेळ अवकाशात राहिल्यानंतर रॉकेटने पुन्हा लँडिंग केले.