नक्षलवाद्यांनी लँडमाईन्सनं रेल्वे ट्रॅक उडवला; हावडा-मुंबई रेल्वे मार्ग ठप्प - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, April 26, 2021

नक्षलवाद्यांनी लँडमाईन्सनं रेल्वे ट्रॅक उडवला; हावडा-मुंबई रेल्वे मार्ग ठप्प

https://ift.tt/3sSwJIU
रांची : झारखंडच्या रेल्वे विभागात रविवारी रात्री नक्षलवाद्यांकडून घडवून आणण्यात आला. यामुळे हावडा - मुंबई मुख्य झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चक्रधरपूर रेल्वे विभागाच्या लोटापहाडजवळ नक्षलवाद्यांनी लँडमाईन्सच्या मदतीनं रेल्वे ट्रॅकवरच स्फोट घडवून आणला. रात्री २.१५ मिनिटांनी ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच चक्रधरपूर रेल्वे विभागाकडून संबंधित रेल्वेचं संचालन रोखलंय. स्फोटामुळे रेल्वे ट्रॅकला मोठं नुकसानं झालंय. त्यामुळे हावडा - मुंबई मुख्य रेल्वे मार्गावर रेल्वेचं संचालन आताच शक्य नाही. चक्रधरपूर रेल्वे विभागाच्या वेगवेगळ्या स्टेशन्सवर प्रवासी रेल्वे अडकून पडल्या आहेत. नक्षलवाद्यांकडून रेल्वे ट्रॅक उडवण्यात आल्याचं माहिती मिळताच जिल्हा पोलीस, आरपीएफ सोबतच रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेची अधिक चौकशी सुरू आहे. लवकरच रेल्वे ट्रॅक दुरुस्त करून थांबलेल्या रेल्वेचं संचालन सुरू करण्यात येईल, असं अधिकाऱ्यांनी म्हटलंय. 'ऑपरेशन प्रहार'ला विरोध आझाद हिंद एक्सप्रेसला टार्गेट करत हा रेल्वे ट्रॅक उडवण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. परंतु, नक्षलवाद्यांना यात यश आलेलं नाही. कोणत्याही प्रवासी रेल्वेला यामुळे हानी झालेली नाही. नक्षलवाद्यांविरोधात चालवण्यात येणाऱ्या 'ऑपरेशन प्रहार'चा नक्षलवाद्यांकडून विरोध करण्यात येतोय. नक्षलवाद्यांकडून आज २६ एप्रिल रोजी भारत बंदची घोषणा करण्यात आलीय.