विद्या बालनने उचलला खारीचा वाटा, इस्पितळांना दान केले पीपीई किट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, April 26, 2021

विद्या बालनने उचलला खारीचा वाटा, इस्पितळांना दान केले पीपीई किट

https://ift.tt/2S2FLqe
मुंबई- करोनामुळे देशाची स्थिती आणखीनच बिकट होत चालली आहे. काही ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे तर काही ठिकाणी रुग्णांना बेड मिळण्यास अडचण होत आहे. सरकारने पुरवलेल्या आरोग्यसेवा कमी पडू लागल्या आहेत. अशात लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री इस्पितळांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे. तिने इस्पितळांना १ हजार दान केले आहेत. दुसऱ्यांच्या आरोग्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विद्याने हे उचलेलं पाऊल कौतुकास्पद आहे. आजच्या कठीण काळात अनेकांना कित्येक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत विद्याने तिचा खारीचा वाटा उचलत आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केलं आहे. विद्याने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट करत इतरांनाही मदतीचं आवाहन केलं आहे. तिने पोस्टद्वारे ज्यांना शक्य आहे त्यांनी १ हजार पीपीई किट दान करण्याची विनंती केली आहे. जे कोणी या कामात तिची मदत करेल त्यांच्यासाठी ती स्वतः एक थँक्यू मेसेज लिहून पाठवणार आहे. शिवाय त्यांनी पाठवलेले पीपीई किट संपूर्ण भारतभर पाठवले जाणार आहेत आणि या किटवर देखील थँक्यू लिहिलं जाणार आहे. त्यातून ती आरोग्य कर्मचाऱ्यांचे आपल्यासाठी करत असलेल्या कामाबद्दल आभार मानणार आहे. विद्याने केलेली ही पोस्ट चाहत्यांनादेखील खूप आवडली आहे. त्यांनीही या निराळ्या प्रयत्नांसाठी विद्याचं कौतुक केलं आहे. मागील वर्षी सुरू झालेल्या करोनाच्या साथीत विद्याने पूर्वीही मेडिकलला शिकणाऱ्या विद्यार्थिनीसाठी मदतीचा हात पुढे केला होता. जिथे काही बॉलिवूड कलाकार सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेर फिरायला जात आहेत तिथे असे काही कलाकार इतरांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत.