गर्लफ्रेंडवरून सुरू होतं भांडण; शाळेसमोरच वर्गमित्राची गोळ्या घालून हत्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, April 1, 2021

गर्लफ्रेंडवरून सुरू होतं भांडण; शाळेसमोरच वर्गमित्राची गोळ्या घालून हत्या

https://ift.tt/3rHUa7j
मेरठ: उत्तर प्रदेशातील बुधवारी हादरले. शाळेच्या गेटसमोरच एका विद्यार्थ्याची गोळ्या घालून करण्यात आली. बहसूमा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली. नवजीवन इंटरकॉलेजच्या समोर नववीत शिकणाऱ्या नितीनची त्याचा वर्गमित्र वंशकुमार याने गोळ्या घालून हत्या केली. त्यांच्यात प्रेमसंबंधांवरून वाद झाला होता. पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. इयत्ता नववीचे निकाल घेण्यासाठी विद्यार्थी बुधवारी शाळेत एकत्र आले होते. त्याचवेळी वंश कुमार नावाच्या विद्यार्थ्याने आपल्या वर्गातील विद्यार्थी नितीनवर शाळेच्या गेटसमोरच गोळ्या झाडल्या. शाळेसमोरच गोळीबाराचा आवाज झाल्याने परिसरात खळबळ माजली. केल्यानंतर आरोपी विद्यार्थी घटनास्थळावरून फरार झाला. लोकांनी जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयात नेले. तिथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दुसरीकडे आरोपी विद्यार्थ्याच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी छापे मारण्यास सुरुवात केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीनुसार, दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये गर्लफ्रेंडवरून वाद सुरू होता. त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर वंशकुमार याने नितीनला गोळ्या घातल्या. त्यात त्याचा मृत्यू झाला. आरोपीचा शोध सुरू आहे. ठिकठिकाणी छापेमारी सुरू आहे. पोलीस अधीक्षकांनी (गुन्हे शाखा) सांगितले की, प्रेमसंबंधांवरून ही घटना घडली आहे, असे प्रथमदर्शनी दिसून येते. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.