
कोलकाताः पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी ( ) आज दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होतं. ३० जागांसाठी मतदान होत आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्वाचं लक्ष हे नंदीग्राम विधानसभा मतदारसंघावर आहे. या ठिकाणी पश्चिम बंगालमधील सर्वात मोठी लढत होत आहे. मुख्यमंत्री आणि भाजपचे ( ) यांच्यात ही निवडणूक होत आहे. सुवेंदू अधिकारी यांनी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मतदान केलं. नंदीग्राममधील ७६ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. आपण नंदीग्रामचे भूमीपूत्र आहोत. नंदीग्रामच्या जनतेकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. नंदीग्रामची जनता विकासाला मत देणार की जातीयवादी राजकारणाला? हे आज ठरणार आहे. याकडे सर्वांचं लक्ष आहे. यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावं, असं आवाहन सुवेंदू अधिकारी यांनी केलं आहे. १नंदीग्राममध्ये मतदानासाठी नागरिकांच्या मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केली आहे. फक्त नंदीग्राममध्येच नाही तर पश्चिम बंगालमध्ये बहुतेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून येत आहेत. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी सकाळी ९ वाजेपर्यंत १३.१४ टक्के मतदान झालं आहे, निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. दरम्यान, डेबरा मतदारसंघातील भाजप उमेदवार भारती घोष यांनी टीएमसीच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केला आहे. आपल्या पोलिंग एजंटला टीएमसीच्या १५० गुंडानी घेरलं आहे. त्यांना मतदान केंद्रात जाऊ दिलं जात नाही. तसंच बरुनियामध्ये मतदारांना धमकावलं जात आहे. त्यांना टीएमसीचं चिन्ह दाखवलं जात आहे, असा आरोप भारती घोष यांनी केला आहे. जनतेला विकास हवा आहे. आम्हाला या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स हवे आहे. यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर मतदानसाठी बाहेर पडत आहेत, असं खडगपूरमधील भाजप उमेदवार हिरॉन चॅटर्जी म्हणाले.