नवी दिल्ली: आयपीएलचा १४वा हंगाम सुरू होण्यास फक्त २४ तासांचा कालावधी शिल्लक आहे. उद्या ९ एप्रिलपासून ला सुरूवात होईल. गेल्या काही दिवसांपासून स्पर्धेतील आठ संघातील खेळाडू जोरदार सराव करत आहे. या वर्षी अनेक संघ विजेतेपदासाठी कसून तयारी करत आहे. यात कोलकाता नाइट रायडर्स() चा देखील समावेश आहे. कोलकाता संघाने खेळाडूंचे दोन संघ केले आहे. या दोन संघातील अभ्यास सत्रात धमाकेदार फलंदाजी पाहायला मिळत आहे. काही दिवासंपूर्वी संघातील सलामीवीर शुभमन गिलच्या धमाकेदार फलंदाजीची चर्च झाली होती. आता संघातील आणखी एका खेळाडूने स्फोटक फलंदाजी केली आहे. वाचा- कोलकाताचा माजी कर्णधार ()सराव सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्याने फक्त ५० चेंडूत ९० धावा केल्या. दिनेशची ही फलंदाजीपाहून केकेआरचे चाहते नक्कीच खुश झाले आहेत. कोलकाता संघाने दिनेशच्या फलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जर दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये अशाच पद्धतीने फलंदाजी केली तर कोलकाता संघ नक्कीच विजेतेपद मिळवू शकेल. गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामात दिनेशने स्पर्धेच्या मध्येच कर्णधारपद सोडले होते आणि इयान मॉर्गनकडे नेतृत्व देण्यात आले होते. दिनेशने २०२०च्या हंगामात १४ सामन्यात फक्त १६९ धावा केल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत दिनेशने १८३ धावा केल्या. त्याची सरासरी ६१ इतकी होती. तामिळनाडूला विजेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. वाचा- केकेआरने आतापर्यंत दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. गेल्या वर्षी त्यांना प्ले ऑफमध्ये स्थान मिळवता आले नव्हता. पण या वर्षी तिसरे विजेतेपद मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. यासाठी शुभमन गिल आणि दिनेश कार्तिक या फलंदाजांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. कोलकाताची पहिली लढत ११ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे. तर १३ तारखेला मुंबई इंडियन्सविरुद्ध लढत होईल.