जिनेव्हा: करोनाच्या संसर्गाने जगभरातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा जोर पकडण्यास सुरुवात केली आहे. करोनाच्या विषाणू स्वरुप बदलत असल्यामुळे अनेक देशांसमोरील चिंता वाढली आहे. करोनाचा भारतीय स्ट्रेन बी.१.६१७ इतर देशांमध्येही आढळला आहे. जवळपास १७ देशांमध्ये आढळला असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मंगळवारी सांगितले की, करोनाचा 'डबल म्युटेशन' अथवा 'भारतीय वेरिएंट'मुळे भारतात करोनाचे बाधित वाढण्याचे मुख्य कारण असण्याची शक्यता आहे. करोनाचा B.1.617 हा विषाणू १७ देशांमध्ये आढळला आहे. 'जीआयएसएआयडी'मध्ये याची नोंद केली आहे. वर्ष २००८ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या 'जीआयएसएआयडी' मध्ये इन्फ्लुएंजा विषाणू आणि कोविड-१९ विषाणूच्या जीनोमबाबतची माहिती जमा केली जाते. वाचा: भारतात करोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक वेगाने फैलावत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले. बी.1.617 हा स्ट्रेन भारतातील इतर प्रकारांपेक्षा अधिक जलदपणे विकसित होत आहे. बी.1.617 हा अधिक संसर्गजन्य असून इतर प्रकारही संसर्गजन्य असल्याची शक्यताही जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे. वाचा: वाचा: दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयस यांनी भारतातील करोना परिस्थितीवर ( on India Covid crisis) चिंता व्यक्त केली होती. करोनामुळे भारतातील परिस्थिती हृदयद्रावक असल्याचे त्यांनी म्हटले. भारतातील करोनाचे संकट दूर करण्यासाठी सर्व मदत करत असल्याचेही त्यांनी म्हटले. भारतात मागील काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या वाढत असून सरासरी तीन लाख बाधित आढळत आहेत. मृतांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे.
https://ift.tt/3aNyBN2