रक्तदान शिबिराची संपूर्ण तयारी केली आणि उभा राहिला वेगळाच पेच, मग... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 11, 2021

रक्तदान शिबिराची संपूर्ण तयारी केली आणि उभा राहिला वेगळाच पेच, मग...

https://ift.tt/3o7NPSh
गडचिरोली: राज्यात करोनानं हाहाकार माजला असताना आणि रक्ताचा तुटवडा जाणवत असताना आपणही समाजाचं काही देणं लागतो, या भावनेनं संघटनेतर्फे चांदाळा इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, रक्तदानाच्या क्षणी तिथं वेगळाच पेच निर्माण झाला. अखेर माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत हा पेच सोडवला. या विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. (Blood Donation Camp at Chandala ) वाचा: जिल्हा शिक्षक भारती अनुदानित आश्रम शाळा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार, उपाध्यक्ष महेश बोरेवार,मार्गदर्शक राजू कात्रटवार, अनिल सहारे, सुधीर झंझाड,नितीन चेंबूलवार यांनी संघटनेच्या सदस्यांना रक्तदान करण्याचं आवाहनं केलं होतं. त्यास प्रतिसाद देत संघटनेच्या ३५ शिलेदारांनी रक्तदानासाठी नावही नोंदविलं. मात्र, यातील बहुतेक रक्तदात्यांनी कोविड लसीकरणाचा पहिला डोस घेतला असल्यानं डॉक्टरांनी त्यांचं रक्त घेण्यास असमर्थता दर्शविली आणि ऐनवेळी पेच निर्माण झाला. मात्र, एखादी गोष्ट मनाशी पक्की केलेली असेल आणि हेतू चांगला असेल तर मार्ग निघतोच. याचा प्रत्यय यावेळी आला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदानाच्या पूर्वसंध्येला चांदाळा येथील ग्रामस्थ व अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा चांदाळाच्या माजी विद्यार्थ्यांना या गोष्टीची माहिती दिली व संघटनेच्या हाकेला प्रतिसाद देत अनेक तरुण स्वेच्छेने या पवित्र कार्यासाठी पुढे आले. वाचा: चांदाळा गावातील तब्बल २६ माजी विद्यार्थ्यांनी रक्तदान केलं. त्यांच्याबरोबर संघटनेचे काही पदाधिकारी व ग्रामस्थ असे एकूण ३१ रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबीर यशस्वी केलं. चांदाळा येथील तरुणांनी ऐनवेळी घेतलेल्या पुढाकारामुळं परिसरात त्यांचं कौतुक होत आहे. शिबिराकरिता डॉ. साखरे, सतीश टक्कलवार व त्यांचे वैद्यकीय पथक तसंच, शिक्षक भारती आश्रम शाळा कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी सहकार्य केलं. वाचा: