न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये गोळीबार; चार वर्षाच्या मुलीसह तीन जण जखमी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 9, 2021

न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये गोळीबार; चार वर्षाच्या मुलीसह तीन जण जखमी

https://ift.tt/3uD9S68
न्यूयॉर्क: अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरमध्ये गोळीबाराची घटना समोर आली आहे. या घटनेत चार वर्षाच्या मुलीसह तिघेजण जखमी झाले आहेत. यात दोन महिला आहेत. टाइम्स स्क्वेअरमध्ये झालेली गोळीबाराची घटना ही एका वादावरून झाली. मात्र, जखमींचा या वादाशी कोणताही संबंध नव्हता, असे म्हटले जात आहे. गोळीबाराची घटना शनिवारी सायंकाळी ४.५५ वाजता घडली. एका वादानंतर आरोपींनी गोळीबार केला. यामध्ये एक लहान मुलगी आणि अन्य दोन महिलांना गोळी लागली. गोळीबाराचा आवाज ऐकून या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी तातडीने धाव घेतली. मात्र, आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाचा: पोलिसांनी सांगितले की, गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला शोधण्यासाठी एक शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. न्यूयॉर्क शहराचे महापौर बिल डे ब्लासियो यांनी म्हटले की या हिंसाचारातील आरोपींवर नजर ठेवण्यात येत असून पीडितांना न्याय दिला जाईल. वाचा: याआधीदेखील इडाहो येथील एका शाळेत गुरुवारी एका लहान मुलीने गोळीबार केला होता. या घटनेत दोन लहान मुलांसह तीनजण जखमी झाले होते. गोळीबारानंतर शिक्षकाने मुलीच्या हातातून बंदूक हिसकावून घेतली. जखमींच्या हाताला आणि पायाला गोळी लागली होती.