मुकेश खन्नाच्या यांच्या निधनाच्या अफवा, अभिनेता म्हणाले... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, May 12, 2021

मुकेश खन्नाच्या यांच्या निधनाच्या अफवा, अभिनेता म्हणाले...

https://ift.tt/2RIRaeA
मुंबई: टीव्ही मालिका 'महाभारत'मधील 'भीष्म पितामह' आणि 'शक्तीमान' मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले अभिनेता यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर उठल्या होत्या. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. अनेक युझर्सनी तर त्यांचे फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली देण्यास सुरुवात केली होती. पण यावर अभिनेता मुकेश खन्ना यांनी आपल्या निधनाचं वृत्त हे केवळ असल्याचं सांगत स्पष्टीकरण दिलं आहे. सोशल मीडियावर मुकेश खन्ना यांच्या निधनाच्या अफवा परसल्यानंतर 'नवभारत टाइम्स ऑनलाइन'नं मुकेश खन्ना यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी फोन झालेल्या संभाषणादरम्यान मुकेश खन्ना म्हणाले, 'मी एकदम ठीक आहे. मला समजत नाही अशाप्रकारच्या अफवा कुठून पसरत आहेत. मला अनेक लोकांचे फोन येत आहेत.' याशिवाय मुकेश खन्ना यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओही शेअर केला आहे. ज्यात त्यांनी सांगितलं, 'मी हे सांगण्यासाठी तुमच्यासमोर आलो आहे की, मी एकदम ठीक आहे. मी य सर्व अफवांचं खंडन करतो. हे खूपचं निंदनिय आहे. सोशल मीडियावर हीच समस्या आहे की, लोक मागचा पुढचा विचार न करता अशी वृत्त पसरवतात. माझ्यासोबत तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आहेत आणि ज्याच्याकडे एवढ्या लोकांचे आशीर्वाद आहेत त्याला काय होणार आहे. माझी काळजी केल्याबद्दल धन्यवाद.' आपल्या बिनधास्त विधानासाठी नेहमीच चर्चेत राहणाऱ्या मुकेश खन्ना यांचे मोठे भाऊ सतीश खन्ना यांना काही दिवसांपूर्वीच करोनाची लागण झाली होती. ज्यानंतर करोना संक्रमणासोबतच हृदयविकाराच्या धक्क्यानं त्यांचं मुंबईत निधन झालं. सतीश खन्ना हे ८४ वर्षांचे होते.