कसोटीत ३६व्या वर्षी पदार्पण, पहिल्या ओव्हरमध्ये इतिहास घडवला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 9, 2021

कसोटीत ३६व्या वर्षी पदार्पण, पहिल्या ओव्हरमध्ये इतिहास घडवला

https://ift.tt/3tyiw4r
नवी दिल्ली: झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा जलद गोलंदाज याने इतिहास घडवला. तबिशने ७० वर्षाच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेणारा सर्वात वयस्कर क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला. याआधी १९५१ साली दक्षिण आफ्रिकेच्या जीडब्ल्यू चब यांनी ४०व्या वर्षी कसोटी पदार्पणात पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेतली होती. हरारे स्पोर्ट्स क्लब येथे सुरू असलेल्या कसोटीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने झिम्बब्वेच्या पहिल्या डावातील दुसरी ओव्हर दिली. तबिशचे पदार्पणातील पहिल्या ओव्हरमधील पाच चेंडूवर एकही धाव दिली नाही. त्यानंतर सहाव्या चेंडूवर त्याने झिम्बाब्वेचा ओपनर तारिसाइ मुसाकंदाला बाद केले. वाचा- ३६ वर्षीय तबिशला १८ वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. तबिशने याआधी १३७ प्रथम श्रेणी सामन्यात ५९८ विकेट घेतल्या आहेत. आशिया खंडात प्रथम श्रेणीत ५९८ विकेट घेतल्यानंतर कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळालेला तो पहिला खेळाडू ठरला आहे. तबिशने ३६ वर्ष १४६ दिवशी पदार्पण केले. याधी १९५५ साली पाकिस्तानकडून मीरान बख्स यांनी ४७ वर्ष २८४ दिवशी पहिली कसोटी खेळली होती. तबिशचा जन्म १२ डिसेंबर १९८४ रोजी कराचीत झाला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सिंध संघाकडून खेळणाऱ्या तबिशने २००३ साली प्रथम श्रेणीत पदार्पण केले होते. त्यानंतर १८ वर्ष १४६ दिवसांनी त्याला कसोटी खेळण्याची संधी मिळाली. झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने पहिल्या डावात ८ बाद ५१० धावा केल्या. सलामीवीर आबिद अलीने करिअरमधील पहिले द्विशतक झळकावले. अलीने नाबाद २१५ धावा केल्या. झिम्बाब्वेने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा चार बाद ५२ धावा केल्या होत्या.