नवी दिल्ली : आणि जर तुमच्याजवळ असतील तर त्यातून हजारो रुपये कमवण्याची संधी तुमच्याकडे आहे. चलनातून बाद झालेली आजच्या घडीला तुम्हाला हजारो रुपये मिळवून देऊ शकते. जुन्या चलनांना ऑनलाईन बाजारात मोठी मागणी आहे. या संकेतस्थळावर एक रुपयाची नोट तब्बल ४५००० रुपयाला विक्री करण्यात आली आहे. १९५७ मधील या एक रुपयाच्या चलनी नोटेवर गव्हर्नर एच. एम पटेल यांची स्वाक्षरी आहे. या नोटेचा सिरीयल नंबर १२३४५ असा आहे. Coinbazzar वर या सिरीजमधील एक रुपयाच्या नोटीचे बंडल ४९९९९ रुपये होती. मात्र सवलतीत त्याची किंमत ४४९९९ रुपये करण्यात आली आहे. Coinbazzar च्या वेबसाईटवर शॉप सेक्शनमध्ये जाऊन नोट बंडल या विभागात याची अधिक माहिती मिळेल. केंद्र सरकारने एक रुपयाच्या चलन नोटा २६ वर्षांपूर्वी रद्द केल्या होत्या. त्यानंतर १ जानेवारी २०१५ पासून त्याची पुन्हा छपाई करण्यात आली. नाणी आणि चलनी नोटांचा संग्रह करणाऱ्यांकडे अशा नोटा अजूनही मोठ्या संख्येने आहेत. याच संकेतस्थळावर भारताच्या स्वातंत्रपूर्व काळातील चलनी नोटा असून त्यासाठी जवळपास ७ लाख रुपयांची विक्रमी बोली लागली होती. गेल्या काही महिन्यात जुन्या नोटा, नाणी यांना ऑनलाईन मोठी मागणी आहे. एक रुपया, १० रुपये , १०० रुपये आणि ५०० रुपयांच्या जुन्या चलनी नोटांची ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मोठी किंमत देऊन विक्री होत आहे. ओएलएक्स, इंडियामार्ट यासारख्या प्लॅटफॉर्मवर जुनी नाणी , चलनी नोटा यांचा लिलाव केला जातो. ज्यात विक्री करणारे मोठी कमाई करत आहेत.