ऑक्सिजन टँकरला काही मिनिटांचा उशीर आणि ११ रुग्णांनी गमावले प्राण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 11, 2021

ऑक्सिजन टँकरला काही मिनिटांचा उशीर आणि ११ रुग्णांनी गमावले प्राण

https://ift.tt/3tKuF6x
हैदराबाद : आंध्र प्रदेशच्या तिरुपतीमध्ये ऑक्सिजन पोहचवण्यात झालेला काही मिनिटांचा उशीर ११ रुग्णांच्या प्राणावर बेतला. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याची व्यवस्थाही झाली होती. मात्र गॅस टँकर पोहचण्यात काही मिनिटांचा उशीर झाला. मात्र, तेव्हापर्यंत श्री व्यंकटेश्वर रामनारायण रुईया सरकारी रुग्णालयात दाखल असलेल्या ११ रुग्णांनी आपले प्राण गमावले होते. मिळालेल्या माहितीनुसार, ८.३० मिनिटादरम्यान ऑक्सिजनचा दाब कमी होण्यास सुरूवात झाली होती. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्याआधीच ११ झाला. यामुळे हताश कुटुंबीयांनी कोविड आयसीयूमध्ये घुसून केली. यामुळे काही उपकरणांना नुकसान पोहचल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिलीय. कृत्रिम ऑक्सिजनवर अवलंबून असलेल्या ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेला पुष्टी दिलीय. चिरुपती, चित्तूर, नेल्लोर आणि कडापा इथल्या रुग्णालयांत जवळपास १००० कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात एव्हाना १३ लाखांहून नागरिकांना करोनानं गाठलंय. सोमवारी ही घटना घडली. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री वाय एस जननमोहन रेड्डी यांनी कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठकही बोलावली होती.