मिलिंदने शेअर केला फोटो, चाहते म्हणाले- तू म्हातारा कधी होणार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 8, 2021

मिलिंदने शेअर केला फोटो, चाहते म्हणाले- तू म्हातारा कधी होणार?

https://ift.tt/3tAYE0E
मुंबई- बॉलिवूडचा फिट अभिनेता आणि मॉडेल याची पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. मिलिंद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो. मिलिंदची आगळी वेगळी लव्हस्टोरीही चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चिली जाते. मिलिंद अनेकदा त्याच्या मॉडेलिंगच्या दिवसातील काही फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकताच त्याने १९९१ मध्ये केलेल्या फोटोशूट मधला एक फोटो चाहत्यांसोबत शेअर केला. हा फोटो पाहून चाहत्यांनीही आश्चर्य व्यक्त केलंय. सोबतच मिलिंदच्या फोटोवर भरभरून कमेंटदेखील केल्या आहेत. मिलिंदने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला फोटो ३० वर्ष जुना आहे. या फोटोत मिलिंद खूप आकर्षक दिसत आहे. हे फोटोशूट त्याने काश्मिरी टेक्सटाइलसाठी केलं होतं. फोटोमध्ये मिलिंदने काळ्या रंगाची शॉर्ट्स घातली आहे. हा फोटो शेअर करत मिलिंदने लिहिलं, 'गुरुवार, १९९१, खरंच अतिशय सुंदर जुनं काश्मिरी टेक्सटाइल, काळी शॉर्ट्स, दिल्लीचा उन्हाळा, भरत सिक्का आणि मी.' फोटो पाहिल्यावर चाहत्यांना विश्वास बसेनासा झाला की हा फोटो ३० वर्ष जुना आहे. चाहत्यांच्या मते मिलिंद अजूनही तितकाच सुंदर आणि आकर्षक दिसतो. मिलिंदच्या फोटोवर चाहत्यांनी निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. सगळ्यात आधी तर मिलिंदची पत्नी हिने कमेंट करत त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका युझरने त्याला विचारलं, 'तू म्हातारा कधी होणार आहेस?' आणखी एका युझरने त्याचं कौतुक करत म्हटलं, 'अरे काहीच बदललं नाहीये. फक्त तुझ्या केसांचा रंग बदललाय.' तर दुसऱ्या युझरने लिहिलं, 'वाह सर तुम्ही सुपर हॅण्डसम आहात.' अजून एका युझरने लिहिलं, 'शानदार, जबरदस्त, जिंदाबाद.' काही दिवसांपूर्वीच मिलिंदला करोनाची लागण झाली होती. करोनावर मात करत मिलिंदने इतरांनाही काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.