इंधन दर ; जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 9, 2021

इंधन दर ; जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव

https://ift.tt/3twkJ0b
मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी सलग चार दिवस इंधन दरवाढ केल्यांनतर आज रविवारी इंधन दर स्थिर ठेवले आहेत. यापूर्वी काल शनिवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नव्हता. आज रविवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९७.६१ रुपये झाला आहे. तर दिल्लीत पेट्रोल ९१.२७ रुपये झाले आहे. चेन्नईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९३.१५ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९१.४१ रुपये झाला आहे. आज मुंबईत एक लीटर ८८.८२ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेलचा भाव ८१.७३ रुपये झाला आहे. चेन्नईत डिझेल ८६.६५ रुपये प्रती लीटर आहे. कोलकात्यात डिझेल ८४.५७ रुपये प्रती लीटर झाले आहे. सलग चार दिवस झालेल्या दरवाढीने राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. राजस्थानमधील श्री गंगानगरमध्ये एक लीटर पेट्रोलचा भाव १०२.१५ रुपये झाला आहे. तर मध्य प्रदेशातील अनुपूरमध्ये पेट्रोल १०१.८६ रुपये आहे.अमेरिकन कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडच्या दरात ८ सेंट्सची वाढ झाली आहे. तेलाचा भाव ६८.१७ डॉलर प्रती बॅरल झाला. तर यूएस टेक्सासमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ९ सेंट्सने वधारला आहे. तो ६४.८० डॉलर प्रती बॅरल झाला.