करोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान! सलग चौथ्या दिवशी ४ लाखांवर नवीन रुग्ण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 9, 2021

करोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान! सलग चौथ्या दिवशी ४ लाखांवर नवीन रुग्ण

https://ift.tt/3hqajgn
नवी दिल्लीः देशातील करोनाची दुसरी लाट ओसरण्याचं ( ) नाव घेईना. देशात आज रविवारी सलग चौथ्या दिवशी करोनाचे ४ लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. मृतांची संख्याही ४ हजारांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशात करोनाचे ४ लाख ३ हजार, ७३८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ४०९२ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात करोनाचा संसर्ग झालेल्या नागरिकांची एकूण संख्या आता २.२२ कोटींवर गेली आहे. करोनाने देशात आतापर्यंत २, ४२, ३६२ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत करोनातून ३, ८६, ४४४ रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत करोनातून एकूण १, ८३, १७, ४०४ जण बरे झाले आहेत. करोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने अॅक्टिव्ह रुग्णही वाढत आहेत. देशात सध्या ३७ लाख ३६ हजार ६८४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर देशात करोनाचा पॉझिटिव्हिटी दर हा २१.६४ टक्क्यांवर आहे. करोनाविरोधी लढाईत सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेत गेल्या २४ तासांमध्ये २०, २३, ५३२ जणांना लस देण्यात आली आहे. देशात आतापर्यंत १६, ९४ , ३९, ६६३ जणांचे लसीकरण झाले आहे. भारतात गेल्या ८ दिवसांपासून करोनाचे रुग्ण मोठ्या संख्येत दिसून येत आहेत. आठ मे रोजी ४, ०१, ०७८ , सात मे रोजी ४, १४, १८८, सहा मे रोजी ४, १२, २६२, पाच मे रोजी ३, ८२, ३१५, चार मे रोजी ३, ५७, २२९, तीन मे रोजी ३, ६८, १४७, दोन मे रोजी ३, ९२, ४८८ आणि १ मे रोजी ४, ०१, ९९३ इतके नवीन रुग्ण आढळून आले होते. करोना रुग्णांच्या मृत्युंमध्येही वाढ होत आहे. आठ मे रोजी ४१८७, सात मे रोजी ३९१५, सहा मे रोजी ३९८०, पाच मे रोजी ३७८०, चार मे रोजी ३४४९, तीन मे रोजी ३४१७, दोन मे रोजी ३६८९ आणि १ मे रोजी ३५२३ जणांचा करोना मृत्यू झाला.