दुर्देव... घरी जाण्यासाठी विमानात बसणार इतक्यातच करोना पॉझिटीव्ह सापडला आयपीएलचा खेळाडू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 8, 2021

दुर्देव... घरी जाण्यासाठी विमानात बसणार इतक्यातच करोना पॉझिटीव्ह सापडला आयपीएलचा खेळाडू

https://ift.tt/3uuHtyX
नवी दिल्ली : आयपीएलच्या खेळाडूबाबत एक अजब गोष्ट आता समोर आली आहे. घरी जाण्यासाठी हा खेळाडू विमानामध्ये बसण्यासाठी निघाला होता पण त्यापूर्वी तो करोना पॉझिटीव्ह सापडल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता या खेळाडूला आपल्या घरी जाता येणार नाही. विमानात जाण्याच्या काही दिवसांपूर्वी त्याची करोना चाचणी घेण्यात आली होती आणि तो निगेटीव्ह सापडला होता. पण सध्याच्या घडीला तो करोना पॉझिटीव्ह सापडला आहे आणि त्याला आता घरी जाता येणार नाही. मायदेशी परतण्यासाठी न्यूझीलंडचा टीम सेफर्ड हा सज्ज झाला होता. पण विमानामध्ये बसण्यापूर्वी सर्व जणांच्या करोना चाचण्या घेतल्या जातात. यावेळी घेण्यात आलेल्या चाचणीत सेफर्ड हा करोना पॉझिटीव्ह असल्याचे समजले. त्यामुळे आता त्याला भारतामध्येच क्वारंटाइन राहावे लागणार आहे. यावर्षीच्या आयपीएलमध्ये सेफर्ड हा कोलकाता नाइट रायडर्सचे प्रतिनिधीत्व करत होता. न्यूझीलंडच्या क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाइट यांनी सांगितले की, " सेफर्डच्या १० दिवसांमध्ये सातवेळा करोनाच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यावेळी तो निगेटीव्ह असल्याचा अहवाल आला होता. पण आता तो करोना पॉझिटीव्ह सापडला आहे. मला आशा आहे की, कोलकाता नाइट रायडर्सचा संघ त्याची योग्य ती काळजी घेईल." न्यूझीलंडच्या खेळाडूंसाठी दोन खासगी विमानांची सोय करण्यात आली आहे. यामधील एक विमान यापूर्वीच रवाना झाले आहे, तर दुसरे खासगी विमान आज रवाना होणार आहे. पण सेफर्ड आता काही दिवस तरी न्यूझीलंडला जाता येणार नाही. कारण त्याला आता काही दिवस भारतामध्येच क्वारंटाइन राहावे लागणार आहे. क्वारंटाइनमध्ये त्याच्या तीन करोना चाचण्या होणार आहेत. या चाचण्यांमध्ये तो निगेटीव्ह सापडला तरच त्याला मायदेशीत जाता येणार आहे. सेफर्ड आता १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे. सध्याच्या घडीला तो चेन्नईला जाण्याच्या प्रतिक्षेत आहे. कारण चेन्नईमध्ये त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येणार आहेत. या हॉस्पिटलमध्येच चेन्नई सुपर किंग्सचे फलंदाजी प्रशिक्षक माइक हसी यांच्यावर उपचार करण्यात आले होते.