सात जन्माची साथ क्षणात संपली, पत्नीला माहेरी सोडून घरी निघाला तोच... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 11, 2021

सात जन्माची साथ क्षणात संपली, पत्नीला माहेरी सोडून घरी निघाला तोच...

https://ift.tt/2Q7P9bn
अमरावती : अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. इथे एका भीषण अपघातामध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे या तरुणाचा अवघ्या दोन महिन्यांआधी विवाह झाला असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिण्यापुर्वीच तरुणाचं लग्न झालं होतं. सहजिवनाची सुरुवात झाल्याने घरात आनंदाचं वातावरण होतं. अशातच पत्नीला माहेरी सोडून गावाकडे परत येत असताना युवकाच्या कारला मालवाहू वाहनाने धडक दिल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सुखी आयुष्याची स्वप्ने पूर्ण होण्याआधीच काळाने घाला घातल्याने त्यांचा संसार अर्धवटच राहिला. खरंतर, लग्नामुळे घरात सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. तिथे त्याच्या मृत्यूच्या बातमीने शोककळा पसरली. ही घटना पारडसिंगा गावासमोरील पुलाजवळ रविवारी रात्री उशीरा घडली. प्रशीस हरिचंद्र उभाळे (२८) रा. वरुड जि.अमरावती असं मृतक तरुणाचं नाव आहे. दोन महिन्यापूर्वीच मृतक प्रशीसचा विवाह नागपूर येथील तरुणीशी विवाह झाला होता. रविवारी त्याने पत्नीला मारोती कारने (एमएच २७/ एसी ९०८८) नागपूर इथं माहेरी सोडून दिलं आणि सायंकाळी परतीच्या प्रवासाला लागला. दरम्यान, पारडसिंगा गावासमोरील पुलाजवळ पोहचताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या बोलेरो मालवाहू वाहनाने (एमएच २६/ व्ही ४४५२) त्याच्या कारला जबर धडक दिली. यात प्रशीसचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती काटोल पोलिसांना मिळताच त्यांची घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी हरिचंद्र सूर्यभान उभाळे यांच्या तक्रारीवरून मालवाहू चालकाच्या विरोधात अपघाताचा गुन्हा नोंदवण्यात आला.