मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री घेणार राज्यपालांची भेट, मोठ्या निर्णयाची शक्यता - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 11, 2021

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री घेणार राज्यपालांची भेट, मोठ्या निर्णयाची शक्यता

https://ift.tt/3eB0Voj
मुंबई : मराठा आरक्षण सुर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्यानंतर आता राज्य सरकारने आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याच पार्श्वभूमिवर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण आणि मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरक्षण देण्याचा निर्णय हा आता केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींचा आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे राज्यपालांची भेट घेऊन त्यांना यासंबंधी निवेदन करणार आहे. संध्याकाळी ५ वाजता ही भेट होणार असल्याची माहिती आहे. पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेट देतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. खरंतर, राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार असा वाद सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे राज्यपाल आज नेत्यांना भेट देणार का? त्यांचं म्हणणं ऐकून घेत मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रपतींना निवेदन पाठवणार का? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवला आहे. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात असल्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केलं. मराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा गायकवाड आयोगाचा निष्कर्षही चुकीचा असल्याचं निरीक्षण पाच न्यायमूर्तींच्या पूर्ण पीठाने निकालात नोंदवलं आहे.