कोविड रुग्णांवर बेकायदेशीर उपचार; खासगी दवाखाना सील - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, May 10, 2021

कोविड रुग्णांवर बेकायदेशीर उपचार; खासगी दवाखाना सील

https://ift.tt/3tswogw
गडचिरोली: कोविड सदृश्य सर्दी-खोकला-ताप यासारखी लक्षणे असलेल्या रुग्णावर परवानगी नसताना व आरोग्य विभागाला न कळवता परस्पर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरचा दवाखाना सील करण्यात आला आहे. जिल्ह्यातील तालुका मुख्यालय परिसरात ही कारवाई करण्यात आली. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. () जिल्ह्यात खासगी रुग्णालयात कोविड सदृश्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचाराचा परवानगी नाही. असं असतानाही अहेरी तालुका मुख्यालयातील डॉ. अमोल पेशेट्टीवार यांच्या खासगी दवाखान्यात कोविड रुग्णांवर उपचार सुरू असल्याची गोपनीय माहिती कोविड नियंत्रण पदाधिकाऱ्यांना मिळाली होती. ही माहिती मिळताच अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांनी इतर पदाधिकाऱ्यांना घेऊन धाड टाकली. तेव्हा तिथं सहा रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं आढळून आलं. त्याच क्षणी रुग्णांची तपासणी केली असता एक रुग्ण करोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. त्यानंतर त्यांनी तातडीनं दवाखाना सील करून संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस विभागाला दिले. वाचा: या दवाखान्यात तीन ऑक्सिजन सिलिंडर, नऊ ऑक्सिजन पॉईंट आढळून आले असून रुग्णांची कुठल्याही प्रकारची नोंद आढळली नाही. ही कारवाई अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी, वैद्यकीय अधीक्षक के. डी. मडावी, तालुका वैद्यकीय अधिकारी किरण वानखेडे, मुख्याधिकारी अजय साळवे यांनी केली. परवानगी नसताना कोविड रुग्णांवर उपचार सुरू होते. धाड टाकल्यावर सहा रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं निदर्शनास आलं. त्यापैकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलाय. गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलाय, असं अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांनी सांगितलं. वाचा: