फडणवीसांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण अपेक्षित होतंः भाजप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, May 10, 2021

फडणवीसांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण अपेक्षित होतंः भाजप

https://ift.tt/3y2x8MH
मुंबईः मुंबईतील करोना मृतांची आकडेवारी व चाचण्यांवरुन विरोधीपक्ष नेते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहलं होतं. फडणवीसांच्या या पत्रावरुन आरोप-प्रत्यारोप रंगले असतानाच आता भाजप नेते यांनीही ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 'विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. त्याला उत्तर देणं अपेक्षित होतं. मात्र, उंटावरुन शेळ्या हाकण्याचा प्रकार मुंबई महापालिका गेल्या कित्येक वर्षांपासून करतेय. त्याचाच परिचय पुन्हा एकदा शिवसेनेनं दिला आहे,' अशा शब्दांत दरेकरांनी शिवसेना व ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'आरटीपीसाआर चाचण्या कमी करुन संसर्ग दर कमी दाखवले जात असल्यासंदर्भात तसेच कोविडमुळं झालेले मृत्यू अन्य कारणांमुळं झाले असल्याची नोंद होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ही अनियमितता आपल्या पत्रात तारखा, उदाहरणांसह उघड केली. त्याला मोघम उत्तर देत मुंबई महानगरपालिकेनं आणखी संशय वाढवला आहे,' असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. 'आरटीपीसीआर चाचण्या केल्यानंतर संसर्ग दर २३. ४३ टक्क्यांपर्यंत कसा गेला, हे मान्य करता मग मासिक संसर्ग दर मार्चमध्ये वाढून ११. २३ टक्के व एप्रिलमध्ये १८. ०६ टक्क्यांपर्यंत गेला. ही माहिती का लपवून ठेवता? मासिक आकडेवारी देऊन दुसऱ्या लाटेत काय लपवण्याचे गौडबंगाल आहे?,' असा सवाल दरेकरांनी केला आहे.