नवी दिल्लीः देशात गेल्या २४ तासांत १ लाख ६५ हजार ५५३ नवीन रुग्ण ( ) आढळले. यादरम्यान ३४६० जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. सलग १० व्या दिवशी करोना संसर्गाचा दर हा देशात १० टक्कांच्या खाली ( ) आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. देशात सध्या २१ लाख १४ हजार ५०८ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत २ लाख ७६ हजार ३०९ नागरिक करोनातून मुक्त झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार गेल्या २४ तासांत ३० लाख ३५ हजार ७४९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. देशात आतापर्यंत एकूण २१,२०,६६, ६१४ जणांचे लसीकरण झाले आहे. देशात करोना संसर्गाचा पॉझिटिव्हिटी दर हा ८.०२ टक्के आहे. गेल्या सहा दिवसांपासून हा पॉझिटिव्ही दर १० टक्क्यांच्या आत आहे. गेल्या ४६ दिवसांमध्ये करोनानेचे आज सर्वात कमी रुग्ण समोर आले आहेत. याशिवाय सलग १७ व्या दिवशी करोनाचे सर्वाधिक रुग्ण बरे झाले आहेत.