जयंत सोनोने, अमरावती घनदाट जंगले आणि वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतींनी नटलेल्या घाटांचा मेळ असलेला जैवविविधतेने संपन्न आहे. त्याच मेळघाटात आता (स्पायडर) प्रजातीचा जगातील पहिला ट्रोपीझोडीअम विरिदुर्बिअम नर आढळून आला आहे. जीवशास्त्राचे अभ्यासक प्रा. अतुल बोडखे आणि त्यांच्या संशोधन टीमने केलेल्या संशोधनाच्या निष्कर्षातून यावर शिक्कामोर्तब झाले आहे. (world's male of found in ) दर्यापूरच्या स्तित स्पायडर संशोधन प्रयोग शाळेचे अतुल बोडखे आणि संशोधन टीम यांनी मेळघाटात जगातील ट्रोपिझोडिअम विरिदुर्बिअम या पहिल्या नर कोळ्याची नोंद करण्यात आली. या जातीच्या पहिल्या मादीची नोंद गुजरात मधील गांधीनगर येथील पालजजवळील अरण्य पार्क येथेन वर्ष २०१६ मध्ये घेण्यात करण्यात आली. हा कोळी मेळघाट मधील तापी नदी काठी असलेल्या जंगलामधून तसेच धारखोरा बुरळघात व नवाब नाला घटाग, धारणी रोड येथे आढळला. सध्या मेळघाटात कोळ्यांच्या एकूण २०४ प्रजातींची नोंद झालेली आहे. या प्रजातीचा नर हा लाबीने ३.६ मीमी लांब असून मादी ४.१ मीमी लांबीची आहे. हा कोळी जंगलातील पालापाचोळ्यामध्ये सापडतो. तसेच हा निशाचर असून खूप छोटा असल्याकारणाने ओळखण्यास कठीण जातो. मेळघाटात या स्पायडरसारख्या विविध प्रजातींचा शोध लावण्याकरता पुन्हा शोध कार्य करण्याची गरज आहे. क्लिक करा आणि वाचा- या कोळी (स्पायडर) प्रजातीचा संपूर्ण अभ्यास कोळी संशोधन प्रयोगशाळा, जे. डी. पाटील सागऴुदकर महाविद्यालय दर्यापूर येथे करण्यात आले आहे. या प्रयोग शाळेतून आतापर्यंत १७ नवीन कोळी प्रजतींचा शोध लागलेला आहे. या सर्व प्रजतींचा अभ्यास भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून, भारत सरकार यांचा सहयोगाने होत आहे. हा प्रकल्प वातावरण, जंगल व हवामान बदल मंत्रालय भारत सरकार यांच्या आर्थिक सहकार्याने होत आहे. या संशोधनात भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून येथील डॉक्टर व्ही.पी उनियाल व डॉ. शाजिया कासिन, सुभाष कांबळे, डॉ. महेश चिखले, डॉ. गजानन संतापे व सावन देशमुख यांचा सहभाग होता. क्लिक करा आणि वाचा- ट्रोपीझोडीअम या कोळ्याची पोटजातीच्या १२ प्रजाती जगामध्ये दिसतात. त्यांपैकी भारतात ५ आढळतात. सध्या भारताव्यतिरिक्त जगामध्ये हवाई, फ्रेंच पोलिनेसिया, बाली, चीन, पाकिस्तान, थायलंड व उत्तर ऑस्ट्रेलिया येथे आढळतात. क्लिक करा आणि वाचा-