
पल्लकड: केरळमध्ये रविवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीचे कल हाती आले आहेत. त्यात भाजपचे उमेदवार मेट्रोमॅन हे विधानसभा मतदारसंघातून जवळपास २ हजार मतांनी आघाडीवर होते. पलक्कडमधून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीधरन यांनी सुरुवातीचे निकालात आघाडी घेतली आहे. एक्झिट पोलमध्ये काँग्रेसचे उमेदवार शफी पराम्बिल, श्रीधरन आणि डाव्या पक्षाचे उमेदवार यांच्यात काट्याची टक्कर होईल, असे भाकित वर्तवले होते. २०१६च्या विधानसभा निवडणुकीत पराम्बिल हे विजयी झाले होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार हे दुसऱ्या स्थानी होते. एलडीएफ आघाडीवर सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहेत. माकपच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी एलडीएफला राज्यातील १४० पैकी ७५ जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसत आहे. तर काग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफला ५६ जागांवर आघाडी मिळाली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए पलक्कडमधील दोन्ही जागांवर आघाडीवर आहे. नेमोन येथून मेट्रो मॅन इ. श्रीधरन हे रणांगणात आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत केरळात भाजपला फक्त नेमोन या जागेवर विजय मिळाला होता.